40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपाकमध्ये २ स्फोट : बलुचिस्तानात २५ ठार

पाकमध्ये २ स्फोट : बलुचिस्तानात २५ ठार

इस्लामाबाद : पाकिस्तानातील मतदानाच्या एक दिवस आधी बलुचिस्तानमध्ये दोन स्फोट झाले. पहिला स्फोट पिशीन शहरात झाला. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले. पाकिस्तानी मीडिया जिओ न्यूजनुसार, अपक्ष उमेदवार असफंद यार खान काकर यांच्या कार्यालयाबाहेर हा स्फोट झाला. स्फोटावेळी काकड कार्यालयात उपस्थित नव्हते.

त्याचवेळी बलुचिस्तानच्या किला सैफुल्ला येथे दुसरा स्फोट झाला. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत.

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणूक असून सर्व प्रांतांमध्ये निवडणुका आहेत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने या हल्ल्याबाबत बलुचिस्तानचे मुख्य सचिव आणि पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.

अलीकडच्या काळात बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. बलुच लिबरेशन आर्मी बलुचिस्तान आणि पाकिस्तान तालिबान खैबरमध्ये हल्ले करत आहे.

या अहवालात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी सिनेटमध्ये ८ फेब्रुवारी रोजी होणारे मतदान पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. अलीकडच्या काळात दहशतवाद आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटना कोणत्यातरी षडयंत्राकडे बोट दाखवत आहेत.

निवडणूक आयोगाबाहेर स्फोट
५ फेब्रुवारीला सकाळी बलुचिस्तानमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर बॉम्बस्फोट झाला. हा स्फोट कोणी आणि का केला याची माहिती मिळू शकली नाही.

५ फेब्रुवारीला खैबरमध्ये हल्ला
५ फेब्रुवारी रोजी खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दरबार शहरातील पोलीस ठाण्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये १० पोलिसांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. पोलिस प्रमुख अख्तर हयात यांनी सांगितले ३० हून अधिक दहशतवाद्यांनी पोलिस स्टेशनवर हल्ला केला. त्यांनी पोलीस ठाण्याला चारही बाजूंनी घेरले आणि ग्रेनेड फेकले. यानंतर गोळीबार सुरू झाला.
…………….

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR