26.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात ३२ व्या कृषिप्रदर्शनाचे उद्घाटन

पुण्यात ३२ व्या कृषिप्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे, प्रतिनिधी – भारतातील सर्वांत मोठे कृषि प्रदर्शन असलेल्या किसान २०२३ या ३२ व्या कृषिप्रदर्शनाचे पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, येथे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पहिल्या येणा-या शेतक-­यांच्या गटातर्फे हे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या शेतक-­यांचा समावेश होता. प्रदर्शन १७ डिसेंबरपर्यंत सुरू राहील.

सुमारे १५ एकर प्रदर्शन क्षेत्रावर ४५० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनात, एक लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतक-यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

किसान प्रदर्शनाला शेती क्षेत्रातील मान्यवर संस्थांचा सहभाग व सहकार्य लाभले आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषि निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतक-यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे.

मोबाईलचा वाढता वापर आणि डिजिटल इंडिया उपक्रमांमुळे शेतक-यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतक-यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषि क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणा-या संधींची माहिती घेऊ शकतील. प्रदर्शनामध्ये कृषि क्षेत्रातील नवउद्योजकांसाठी स्पार्क या दालनाचा समावेश असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR