15.6 C
Latur
Friday, January 3, 2025
Homeपरभणीसेलू येथे खासगी बाजार समितीचा शुभारंभ

सेलू येथे खासगी बाजार समितीचा शुभारंभ

सेलू : प्रतिनिधी
आज दिनांक १५.१२.२०२३ रोजी सेलू येथील महेश खाजगी बाजार समिति चा शुभारंभ करण्यात आला . रवळगाव रोड येथील महेश एग्रो इंडस्ट्रीज येथे श्री विपिन सीतारामजी मंत्री यांनी सुरू केलेल्या खासगी बाजारचा कापूस खरेदीने मुहूर्त करण्यात आला . ह्यावेळी शेतकरी शेख दीलावर शेख यासीन, रायभान बरकुले , भानुदास रासवे , दत्तराव जाधव , गुलाबराव पौळ, सुदर्शन ताठे आदि उपस्थित होते.

ज्यामध्ये उच्च प्रतिच्या मालाला ७३१५ व रेनटच कापसला ६९०० भाव देण्यात याला सरासरी ७२०० रुपये भाव बीट पुकारून देण्यात आला. ह्यावेळी सर्व खरेदीदार व मान्यवर श्री जयप्रकाशजी बिहणी, अशोकजी मंत्री, रामेश्वरजी राठी, शैलेश तोषणीवाल, नीलेशजी बिनायके, राम नाना पाटील, गोपळजी काबरा, नभाराम पोवार, निर्मलजी, अभिषेकजी तायल आदींची उपस्थिती होती. शेतकऱ्यानी दररोज सकाळी ९.३० वा वाहने महेश खाजगी बाजार समिति रवळगाव रोड येथे लावावी असे आवाहन सचिव, महेश खाजगी बाजार समितीच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR