सोलापूर – अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूर येथे पहिल्या मजल्यावरील जागेमध्ये ग्रॅस्ट्रोएंटरोलॉजी, बालरुग्ण, ईएनटी व डायटेशियन विभागाचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. सदर विभागाचे उद्घाटन अश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपिन पटेल यांच्या हस्ते पार पडले. तसेच पहिल्या मजल्यावरील मेल वॉर्डाचे नूतनीकरण करण्यात आले असून, सदर विभागाचे उद्घाटन संचालक डॉ. विजय पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले. याबरोबरच रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील फिमेल वॉर्डाचे नूतनीकरण करण्यात आले असून या विभागाचे उद्घाटन संचालिका श्रीमती यशोदाबाई डागा यांच्या शुभहस्ते पार पडले.
सदर नूतनीकरण करण्यात आलेल्या पुरुष व स्त्री वॉर्डामध्ये छइक च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रुग्णांच्या बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये काळानुरुप बदल करण्यात आलेले आहेत. या दोन्ही वॉर्डामध्ये प्रशस्त बेड, पार्टीशन, पंखे व इतर सुविधा पुरविण्यात आलेले आहेत. अश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपीनभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व संचालक मंडळाच्या सहकार्याने रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी नवनवीन सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यावेळी संचालक चंद्रशेखर स्वामी, अशोक लांबतुरे, विलास पाटील आणि तज्ञ डॉक्टर्स डॉ. सिध्देश्वर रुद्राक्षी, डॉ. सुजीत जहागीरदार, डॉ. अमोल पाटील, डॉ. नितीन शाह, डॉ. हरिश रायचूर, डॉ. प्रज्ञा गद्रे, डॉ. विद्याधर बोराडे, डॉ. संतोष बिराजदार, डॉ. आशुतोष यजुर्वेदी, डायटेशियन श्रध्दा पडसलगीकर व वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत औरंगाबादकर, प्रशासकीय अधिकारी सचिन बिज्जरागी उपस्थित होते. या कार्यक्रमास इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग व बहुसंख्य रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.