जिंतूर : येथील शहरी भागासाठी १५व्या वित्त आयोग अंतर्गत टिपु सुलतान चौक, अम्रतेश्वर मठ समोर मेन रोड जिंतूर व सटवाई नगर येथे आरोग्य वर्धिनी केंद्र उभारण्यात आले आहे. या तीन आरोग्य वर्धीनी केंद्राचे उद्घाटन मंगळवार, दि.५ डिसेंबर रोजी आ. मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉ. पंडीत दराडे, माजी नगरसेवक विलास भाडारे, गोपाळ रोकडे, दत्ता कटारे व परीसरातील माता, भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या आरोग्य वर्धीनी केंद्रामध्ये ओपीडी तपासणी, नियमित लसीकरण इत्यादी आरोग्य सेवा असणार आहेत. सदर आरोग्य वर्धीनी केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन आ. बोर्डीकर व जिंतूर आरोग्य विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जिंतूर आरोग्य विभाग यांच्या मार्फत करण्यात आले होते.