27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र‘डबल महाराष्ट्र केसरी’ कटकेंच्या घरी आयकरचा छापा

‘डबल महाराष्ट्र केसरी’ कटकेंच्या घरी आयकरचा छापा

पुणे : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत.

अशातच पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते, विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार अमोल बालवडकर यांच्या सास-यांच्या घरी म्हणजेच महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी पैलवान अभिजित कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे.

अमोल बालवडकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते असून ते विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी भाजपने उमेदवारी जाहीर केलेल्या कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विधानसभा लढवण्याची तयारी केली आहे.

उमेदवारी न दिल्यास बंडखोरीच्या तयारीत असल्याचेही संकेत त्यांनी दिले होते. अशातच आता त्यांच्या सास-यांच्या घरी छापेमारी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR