28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रहिंदुजा ग्रुपच्या कार्यालयात आयकर विभागाची शोधमोहीम

हिंदुजा ग्रुपच्या कार्यालयात आयकर विभागाची शोधमोहीम

मुबई : आयकर विभागाने बुधवारी हिंदुजा ग्रुपच्या मुंबई आणि इतर शहरांमध्ये असलेल्या कार्यालयात शोधमोहीम राबवली. करचुकवेगिरीच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. कंपनीच्या मुंबई आणि इतर काही शहरांमध्ये असलेल्या कार्यालयांची झडती घेण्यात आली आहे. शोध मोहिमेशी संबंधित आयटी कायद्यानुसार, अशी कारवाई केवळ कार्यालयाच्या परिसरातच केली जाऊ शकते.

कर विभागाची कारवाई देखील सामान्य कर प्रतिबंध नियमांच्या (जीएएआर) तरतुदींशी संबंधित आहे. हिंदुजा समुहाकडे इंडसइंड बँक, हिंदुजा लेलँड फायनान्स आणि हिंदुजा बँकची (स्वित्झर्लंड) मालकी आहे. समूह विविधीकरणाकडे वाटचाल करत असून नवीन तंत्रज्ञान, डिजिटल आणि फिनटेक क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR