नाशिक : प्रतिनिधी
आयकर कार्यालयात अधिकारी म्हणून कार्यरत असलेले हरेकृष्ण पांडे यांचे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एका तरुणीसोबत लग्न ठरले होते. वाराणसी येथे त्यांचा साखरपुडा झाला. साखरपुड्याच्या कार्यक्रमात नवरीनं तिच्या प्रियकराला मिठी मारल्याने तिचे प्रेमसंबंध उघड झाले. त्यानंतर आयकर अधिकारी प्रचंड तणावात आला. आयकर अधिका-याने लग्नाच्या आदल्या दिवशी (१७ एप्रिल) टोकाचे पाऊल उचलून आयुष्याची जीवनयात्रा संपविली.
शाळा, महाविद्यालय त्यानंतर नोकरी असे टप्पे पार करत लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी नाशिकच्या आयकर विभागात अधिकारी असलेले हरेकृष्ण पांडे यांच्या कुटुंबाने वाराणसी येथील एका तरुणीशी त्यांचा विवाह ठरवला. काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. मात्र, याच दरम्यान युवतीनेआपल्या प्रियकराला कार्यक्रमात कथित मिठी मारली. तेथून वादाला सुरुवात झाली.
साखरपुड्यातील हा सर्व प्रकार पाहून हरेकृष्ण पांडे मानसिक तणावात गेले. त्यानंतर होणा-या पत्नीने पांडे यांना विविध प्रकारे धमकी देत ब्लॅकमेलिंग करणे सुरू केले. सततचे ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रासाला कंटाळून पांडे यांनी टोकाचे पाऊल उचलले. लग्नाची स्वप्नं पाहण्यापूर्वीच त्यांनी आयुष्याचा शेवट केला. या घटनेनंतर नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
हरेकृष्ण पांडे याचा वाराणसी येथील मोहिनी नावाच्या मुलीसोबत साखरपुडा झाला होता. या कार्यक्रमात मोहिनीचा प्रियकर असलेल्या सुरेश पांडे याने तिला कथित मिठी मारली होती. त्यानंतर तिचे प्रेमसंबंध उघड झाल्याने हरेकृष्ण तणावात होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाची तारीखही ठरली होती. हरेकृष्ण यांचे भाऊ हरेराम यांच्या तक्रारीवरून आम्ही नवरीसह तिचा कथित प्रियकर आणि अन्य संशयिताविरोधात अंबड पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांनी सांगितले.