21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्य कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ?

राज्य कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ?

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकार कर्मचा-यांना दिवाळी भेट देणार असून महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने राज्य कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा दोन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे. बुधवारी होणा-या मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधीचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.

या आधी जून महिन्यात राज्य सरकारने कर्मचा-यांना ४२ टक्के महागाई भत्ता देण्याचे जाहीर केले होते. आता त्यात दोन टक्क्यांची वाढ करून तो ४४ टक्के इतका करण्यात आला आहे. या संबंधीचा निर्णय बुधवारी होणा-या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे. या आधी जून महिन्यात महागाई भत्ता वाढवण्यात आला होता.
मागील अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढविण्याची मागणी करण्यात येत होती. वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो. आज अर्थ विभागाने शासन निर्णय काढून महागाई भत्ता वाढविण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारी कर्मचा-यांचा महागाई भत्ता आता ४२ टक्क्यांवरुन ४४ टक्के करण्यात आला आहे.

केंद्राने केली चार टक्के वाढ
केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली. यानंतर त्यांना मिळणारा डीए आता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR