23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयमोबाईल हॅक होण्याच्या प्रमाणात वाढ!

मोबाईल हॅक होण्याच्या प्रमाणात वाढ!

बळी पडण्यात महिलांचा समावेश अधिक कोणीतरी ठेवतेय तुमच्यावर नजर

नवी दिल्ली : अलीकडे इंटरनेट सर्फिंग मोबाइलवरून करण्यास अनेक जण प्राधान्य देतात. राज्यातील एका शहरात अवघ्या काही तासांत २८ पेक्षा अधिक व्हॉट्सऍप आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले. हॅक करण्यात आलेल्या २८ अकाउंटपैकी २६ अकाउंट महिलांचे आहेत. यावरून हॅकर्सनी महिलांना टार्गेट करायला सुरुवात केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. पोलिसांनी संबंधित हॅकरना राजस्थानमधून अटक केली; परंतु असे प्रकार देशातील विविध शहरांत वारंवार घडत आहेत.

इंटरनेटच्या जमान्यात फोन हॅक होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच, प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रवेश होत आहे, त्यामुळे फोन हॅक करणे सोपे झाले आहे. अशा परिस्थितीत, तुमचा फोन हॅक झाला आहे हे तुम्हाला कसे कळेल? असे काही संकेत आहेत ज्याद्वारे तुम्हाला कळू शकेल की तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही. स्वस्त इंटरनेटमुळे मोबाइलवर इंटरनेट वापरणा-यांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच आता हॅकर्सनी आपला मोर्चा कम्प्युटरऐवजी मोबाइल वापरकर्त्यांकडे वळवला आहे. मोबाइलवर केले जाणारे सायबर हल्ले वाढत चालले आहेत. अशा परिस्थितीत मोबाइलची सुरक्षा एक कळीचा मुद्दा बनला आहे.

बॅटरी लाईफ
जर तुमच्या फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होत असेल, तर तुमचा फोन हॅक झाला असण्याची शक्यता आहे, कारण काहीवेळा बॅकग्राउंडमध्ये चालणा-या हेरगिरी करणा-या एप्समुळे फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. अशा परिस्थितीत फोनच्या बॅटरीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

फोनवर अनावश्यक अ‍ॅप
तुम्ही तुमच्या फोनमधील एप्सबाबत डिटेल्स ठेवा जेणेकरून तुमच्या परवानगीशिवाय कोणतेही अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होणार नाही. असे न झाल्यास फोन हॅक होऊ शकतो.

डिव्हाइस ओव्हरहिटींग
हेरगिरी करणारे अ‍ॅप्स सहसा रिअल टाइममध्ये डिव्हाइसचे लोकेशन ट्रॅकिंग करण्यासाठी जीपीएस सिस्टमचा वापर करतात. अशा परिस्थितीत तुमच्या फोनच्या हार्डवेअरवर जास्त दबाव येतो. त्यामुळे तो जास्त गरम होण्याची समस्या उद्भवते.

डेटा वापरात वाढ
जर तुमचा फोन ट्रॅक केला असेल तर डेटाचा वापर अचानक वाढतो. अशा परिस्थितीत डेटा वापरात अचानक वाढ होत असेल, तर तुम्ही सतर्क राहायला हवे.

डिव्हाइस खराब होणे
फोन हॅकिंगच्या बाबतीत, स्क्रीन फ्लॅशिंग, ऑटोमॅटिक फोन सेटिंग्ज बदलणे किंवा फोन काम न करणे यासारख्या डिव्हाइस खराब होण्याच्या घटना दिसू शकतात.

कॉलिंगमध्ये बॅकग्राऊंड न्वॉइज
काही हेरगिरी करणारे अ‍ॅप्स फोन कॉल रेकॉर्ड करतात. अशा परिस्थितीत, जेव्हा फोन कॉल दरम्यान कोणताही बॅकग्राऊंड न्वॉइज ऐकू येतो तेव्हा सावध राहावे, कारण ते हॅकिंगचे लक्षण असू शकते.

अनावश्यक ब्राउजिंग हिस्ट्री
आपल्या डिव्हाइसची ब्राउझिंग हिस्ट्री चेक करा. ज्यामध्ये ट्रॅकिंग किंवा हेरगिरी एप्लिकेशन डाउनलोड करणा-या लिंकची माहिती मिळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR