25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रकंत्राटी वीज कर्मचा-यांच्या वेतनात वाढ

कंत्राटी वीज कर्मचा-यांच्या वेतनात वाढ

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक वेतन उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई : वीज कर्मचा-यांसाठी खूशखबर असून राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण व महापारेषण या कंपन्यातील कर्मचा-यांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे. कंत्राटी कर्मचा-यांच्या मूळ वेतनात १९ टक्क्याने वाढ केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत तीन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना १९% वेतन वाढ मिळणार असल्याचे सांगितले. आता महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतनवाढ देण्यात आलेली आहे.

या निर्णयाचा लाभ कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि सहाय्यक प्रवर्गातील कामगारांना होणार आहे. या कर्मचा-यांच्या पगारवाढ मार्च २०२४ पासून ही वाढ लागू होणार आहे. पहिली पगारवाढ सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली होती. आरोग्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ‘टॉप अप’ करून वेगळी योजना तयार करण्याचे आदेश दिले आहे. वीज कर्मचा-यांच्या वेतनवाढीसंदर्भात सोमवार दि. ९ सप्टेंबर रोजी बैठक पार पडली. या बैठकीला सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख उपस्थितीत, धनंजय मुंडे देखील ऑनलाईन उपस्थित होते.

मूळ वेतनात १९ टक्के वाढ
ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांतील कंत्राटी कर्मचा-यांच्या मूळ वेतनात १९ टक्के वाढ करण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी याची माहिती दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR