27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रअंगणवाडी सेविकांचा आजपासून बेमुदत संप

अंगणवाडी सेविकांचा आजपासून बेमुदत संप

 

मुंबई : राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी आजपासून आझाद मैदानावर बेमुदत संप पुकारला आहे. अंगणवाडी सेविकांनी ४ डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ पर्यंत ५२ दिवसांचा राज्यव्यापी संप केला होता. त्यावेळी महिला व बालविकास मंत्र्यांनी त्यांच्या मानधनात वाढ करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र सात महिन्यांत याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनानंतरही सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास २१ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी मोर्चा काढण्याचे संकेत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीने दिले आहेत.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रात ० ते ६ वयोगटातील बालके, गर्भवती व स्तनदा माता यांना पूरक पोषण आहार देणे, पूर्व शालेय शिक्षण या सेवा देणे, तसेच लसीकरण, आरोग्य तपासणी, पोषण व आरोग्यविषयक शिक्षण आदी कामे अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येतात. या योजनेमध्ये सुमारे १ लाख १३ हजार अंगणवाडी केंद्रात २ लाख अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत.

काय आहेत मागण्या?
दरम्यान, या अंगणवाडी सेविकांनी आपल्या मानधनात वाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅच्युइटी देण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ पर्यंत ५२ दिवसांचा राज्यव्यापी संप पुकारला होता. यावेळी आशा कर्मचा-यांचे मानधनवाढ झाल्यानंतर लगेच अंगणवाडी कर्मचा-यांना मानधनवाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. परंतु आश्वासन देऊन सात महिने उलटले तरी मानधन वाढीबाबत कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही.

या सेवांवर होणार परिणाम
महिला आणि बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत, सुमारे १.१३ लाख अंगणवाडी केंद्रांमध्ये दोन लाख अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. त्यापैकी सुमारे ९७ प्रकल्प आदिवासी भागात कार्यरत आहेत. ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहार, पूर्व-शालेय शिक्षण आणि सेवा पुरविण्यासाठी अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्रांवर कार्यरत असतात.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR