21.1 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुक्ताईनगरचे अपक्ष उमेदवार सोनावणे यांच्या वाहनावर हल्ला

मुक्ताईनगरचे अपक्ष उमेदवार सोनावणे यांच्या वाहनावर हल्ला

जळगाव : प्रतिनिधी
मुक्ताईनगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनावणे यांनी आपल्या वाहनावर अज्ञातांनी गोळीबार केल्याचा दावा केला. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या संदर्भात विनोद सोनावणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात महायुतीकडून आमदार चंद्रकांत पाटील हे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीकडून रोहिणी खडसे या उमेदवार आहेत. त्याचबरोबर विनोद सोनावणे हे अपक्ष उमेदवार आहेत. विनोद सोनावने हे बोदवड तालुक्यात राजूर गावात आपल्या वाहनातून प्रचार करत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी आपल्या वाहनांवर गोळीबार केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडल्या असल्या तरी त्या वाहनाला न लागता वाहनाच्यावरुन गेल्याने आपण थोडक्यात बचावल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हा घातपाताचा प्रयत्न असल्याची माहिती अपक्ष उमेदवार विनोद सोनावणे यांनी दिली आहे. या घटनेनंतर तक्रार देण्यासाठी सोनावणे हे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात हजर झाले, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR