डेंग्यूविरुद्धच्या पहिल्या लसीला भारताची मंजुरी

नवी दिल्ली : देशात दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूचे संकट अक्राळविक्राळ रूप धारण करते. डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य क्षेत्रातून अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून डेंग्यूवरील पहिल्या लसीला म्हणजेच टीएके-००३ अर्थात (क्युडेन्गा) ला भारत सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे. औषध महानियंत्रकांच्या तज्ज्ञ समितीने ४ ते ६० वयोगटातील लोकांसाठी ही लस सुरक्षित असल्याचे मानले आहे.

जपानच्या टाकेडा फार्मास्युटिकल्स कंपनीने विकसित केलेली ही लस अत्यंत प्रभावी मानली जात आहे. या लसीचे सर्वात मोठे वैशिष्टय म्हणजे, एखाद्या व्यक्तीला पूर्वी डेंग्यू होऊन गेला आहे किंवा नाही, याची कोणतीही तपासणी न करता ही लस देता येते. डेंग्यूच्या चारही प्रकारच्या विषाणूंपासून संरक्षण देण्याची क्षमता क्युडेन्गा लसीमध्ये आहे. क्लिनिकल ट्रायल्समध्ये असे दिसून आले आहे की, ही लस चार वर्षांहून अधिक काळ संरक्षण देऊ शकते. सरकारी आकडेवारीनुसार, २०२० मध्ये ४४ हजार असलेले डेंग्यूचे रुग्ण २०२३ व २०२४ या दोन वर्षात २.३ लाखांच्या पार गेले आहेत; तर गेल्या वर्षी सव्वा लाख रुग्ण सापडले होते.

तथापि, तज्ज्ञ असेही मानतात की, ही लस म्हणजे जादुई समाधान नाही. लस डेंग्यूचा धोका नक्कीच कमी करेल. परंतु तो पूर्णपणे नष्ट करू शकत नाही. डेंग्यूची तीव्रता अनेकदा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लस उपलब्ध झाली असली तरी डासांपासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे तितकेच आवश्यक आहे. लसीमुळे डेंग्यूची तीव्रता आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल, मात्र डासांची उत्पत्ती रोखणे आणि वेळेवर उपचार घेणे हाच डेंग्य ुमुक्तीचा खरा मंत्र ठरणार आहे.

दोन डोसमध्ये मिळणार सुरक्षा
ही लस दोन डोसमध्ये दिली जाणार असून त्यामध्ये तीन महिन्यांचे अंतर असणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही ज्या भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव जास्त आहे, तिथे या लसीचा वापर उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या लसीचे उत्पादन हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेडच्या माध्यमातून भारतातच केले जाणार आहे. यामुळे भविष्यात ही लस माफक दरात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Gunratan Sadavarte LIVE : सदावर्ते जरांगेंना रोखणार? ‘चलो मुंबई’च्या घोषणेनंतर काय म्हणाले?
00:00
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात रोहित पवार! ‘अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा दिलाच पाहिजे’
01:58
Video thumbnail
MPSC STUDENT PROTEST|MPSC विद्यार्थ्यांचा लातुरात आक्रोश;पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
03:44
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
10:07
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46

Latest news