17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडाकेवळ ७१ चेंडूत भारताची बांगलादेशावर मात

केवळ ७१ चेंडूत भारताची बांगलादेशावर मात

ग्वाल्हेर : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ग्वाल्हेरच्या मैदान अगदी सहज मारले. ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला एकतर्फी पराभूत करत भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्यांदा बॅटिंग करणा-या बांगलादेशच्या संघाला १९.५ षटकात १२७ धावांत आटोपले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ७ विकेट्स राखून विजय नोंदवला. भारतीय संघाला विजयासाठी २ धावांची गरज असताना हार्दिक पांड्याने उत्तुंग षटकार मारत मॅच संपवली. भारतीय संघाने हे आव्हान ११.५ षटकात म्हणजे अवघ्या ७१ चेंडूतच पार केले.

संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. अभिषेक ७ चेंडूत १६ धावांची भर घालून रन आउट झाला. त्यानंतर मैदानात उतरलेला कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या भात्यातूनही काही आकर्षक फटके पाहायला मिळाले. त्याने १४ चेंडूत२ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने २९ धावा केल्या. पदार्पणाचा सामना खेळणारा नितेश रेड्डी १५ चेंडूत १६ धावा करून नाबाद राहिला. त्याच्या भात्यातूनही एक सिक्सर पाहायला मिळाला. मॅच फिनिश करणा-या हार्दिक पांड्याने १६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३९ धावांची नाबाद खेळी केली. जी भारतीय संघाकडून केलेली सर्वोच्च धावसंख्याही ठरली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR