17.2 C
Latur
Sunday, January 11, 2026
Homeक्रीडाभारताचा न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय

भारताचा न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय

वडोदरा : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वडोदराच्या मैदानात रंगलेल्या पहिला वनडे अपेक्षेप्रमाणे रंगतदार झाला. पाहुण्या न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३०० धावा करत टीम इंडियासमोर ३०१ धावांचे आव्हान ठेवले होते. ते आव्हान भारताने ४९ व्या षटकात पूर्ण करीत दणदणीत विजय मिळविला.

भारताने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव करीत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना १४ जानेवारी रोजी राजकोट येथे खेळला जाईल. ३०० धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा अवघ्या २६ धावा करून परतल्यावर विराट कोहली आणि शुभममन गिल जोडी जमली. दोघांनी शतकी भागीदारी रचली. कर्णधार शुभमन गिल अर्धशतकी खेळी करून परतल्यावर विराट कोहलीने ९३ धावांची उपयुक्त खेळी केली. तो बाद झाल्यावर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. पण लोकेश राहुल आणि वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियाला दिलासा दिला. वॉशिंग्टन सुंदरने लंगडत लंगडत मैदानात उतरत केएल राहुलला उत्तम साथ दिली. केएल राहुलने षटकार मारून षटक आणि ४ विकेट राखून भारतीय संघाचा विजय मिळवून दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR