24.7 C
Latur
Sunday, March 9, 2025
Homeक्रीडाभारत १२ वर्षांनंतर ‘चॅम्पियन्स’चा ‘चॅम्पियन’

भारत १२ वर्षांनंतर ‘चॅम्पियन्स’चा ‘चॅम्पियन’

दुबई : टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ४९ व्या षटकात २५२ धावांचे लक्ष्य गाठले.

रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी करत ७६ धावा केल्या. श्रेयस (४८ धावा), केएल राहुल (नाबाद ३४ धावा) आणि अक्षर पटेल (२९ धावा) यांनी धावांचा पाठलाग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

गोलंदाजीत कुलदीप यादवने सर्वात मोठी भूमिका बजावली, कारण त्याने दोन षटकांत दोन बळी घेत सामना भारताच्या बाजूने आणला. त्याने रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल (६३ धावा) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR