नवी दिल्ली : अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. आता जॉर्डनचे भारतातील राजदूत मोहम्मद सलाम जमील ए. एफ. अल कायदा यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारत ‘एक उदयोन्मुख शक्ती आहे. इस्राईल-हमास युद्धात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, भारताच्या पंतप्रधानांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांच्याशी अनेक मुद्द्यांवर बोलले आहेत. अर्थातच सुरक्षा व्यवस्था आणि मानवतावादी मदतीबद्दल चर्चा झाली, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, भारत जगातील एक उगवती शक्ती आहे असून अनेक आंतरराष्ट्रीय मुद्यामध्ये भाग घेत आहे. तसेच भारताने गाझाला आधीच मानवतावादी मदत पाठवली आहे. मला वाटते की, भारत या परिस्थितीत समस्या सोडवण्यासाठी आणि तेथील लोकांचे जीव वाचवण्यासाठी भूमिका बजावू शकतो. अलीकडे संयुक्त राष्ट्रांमध्ये युद्धबंदीबाबत आणलेल्या ठरावाला भारत अनुपस्थित होता. यावर जॉर्डनचे राजदूत म्हणाले की, प्रत्येक देशाप्रमाणे भारताचीही ‘स्वत:ची भूमिका’ आहे. सर्व देश आपले हित लक्षात घेऊन आपली भूमिका ठरवतात, त्यामुळे भारतानेही तेच केले. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी जॉर्डनचे राजा अब्दुल्ला यांच्याशी हमास-इस्रायल युद्धाबाबत दोन आठवड्यांपूर्वी चर्चा केली होती. तसेच पंतप्रधान मोदींनी सोमवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्याशीही चर्चा केली आहे.