नागपूर : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव केला. नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ४७.५ षटकांत २४८ धावांवर सर्वबाद झाले. भारताने ३८.४ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठले.
भारताकडून शुभमन गिलने ८७, श्रेयस अय्यरने ५९ आणि अक्षर पटेलने ५२ धावा केल्या. रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. इंग्लंडकडून जोस बटलरने ५२ आणि जेकब बेथेलने ५१ धावा केल्या. आदिल रशीद आणि साकिब महमूद यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.