17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयराफेल सागरी विमाने खरेदीसाठी भारताची फ्रान्ससोबत चर्चा

राफेल सागरी विमाने खरेदीसाठी भारताची फ्रान्ससोबत चर्चा

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि चीनला अडचणीत आणण्यासाठी भारतीय नौदल सातत्याने आपली ताकद वाढवत आहे. ५० हजार कोटींहून अधिक किंमतीचे २६ राफेल सागरी विमाने खरेदी करण्यासाठी भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये ३० मेपासून चर्चा सुरू होणार आहे. या चचेर्साठी फ्रान्सची उच्चस्तरीय टीम भारतात येणार आहे.

राफेल मरीन फायटर जेट हे खास सागरी क्षेत्रात हवाई हल्ल्यांसाठी तयार करण्यात आले आहे. हे विमान आयएनएस विक्रांत आणि विक्रमादित्यवर तैनात केले जाईल. राफेल एम हे विमानवाहू जहाजांवर उतरण्यासाठी तयार करण्यात आले आहे.राफेल मरीनचा आकार हवाई दलाच्या राफेलपेक्षा लहान आहे. या विमानाचे पंख फोल्ड करण्यायोग्य आहेत. हवाई दलाच्या राफेल विमानांचे पंख दुमडता येत नाहीत.

राफेल-एम एका मिनिटात १८ हजार मीटरची उंची गाठू शकते. हे विमान पाकिस्तानकडे उपलब्ध असलेल्या एफ-१६ किंवा चीनकडे उपलब्ध असलेल्या जे-२० पेक्षा खूपच चांगले आहे. विमानाची लढाऊ त्रिज्या ३७०० किलोमीटर आहे. हवाई दलाच्या राफेलप्रमाणे या विमानातही हवेत इंधन भरण्याची क्षमता आहे. या विमानाची निर्मितीही दसॉल्ट एव्हिएशनने केली आहे. हे सिंगल सीटर फायटर जेट आहे. हे विमान समुद्राच्या खोलवरही हल्ला करण्यास सक्षम आहे.

विमानाची लांबी १५.३० मीटर
या विमानाची लांबी १५.३० मीटर, रुंदी १०.९० मीटर आणि उंची ५.३० मीटर आहे. विमानाचे वजन १०,५०० किलो आहे. विमानाच्या वेगाबद्दल बोलायचे झाले तर हे विमान ताशी १३८९ किलोमीटर वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR