30 C
Latur
Sunday, June 1, 2025
Homeअंतरराष्ट्रीयभारतच ‘अ‍ॅपल’चा हब

भारतच ‘अ‍ॅपल’चा हब

ट्रम्पचा विरोध, टॅरिफची धमकी चीनला धोबीपछाड

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ऍपल यांच्यातील टॅरिफवरून सुरू असलेल्या वादात भारताने बाजी मारली आहे. अमेरिकेला होणा-या मासिक आयफोन निर्यातीत भारताने प्रथमच चीनला मागे टाकले आहे, जे ऍपलच्या जागतिक
निर्यात साखळीतील एक महत्त्वाचे पाऊल आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऍपलला यूएस बाजारासाठी भारतात आयफोनचे उत्पादन थांबवण्यास सांगितले आहे पण, त्यांचा इशारा न जुमानता भारतातून आयफोनची निर्यात वेगाने वाढत आहे. एका ईटी अहवालात संशोधन कंपनी ओमडियाचा हवाला देऊन म्हटले आहे की, एप्रिलमध्ये ऍपल विक्रेत्यांनी भारतातून २९ लाख आयफोन अमेरिकेत पाठवले.

एप्रिल २०२५ मध्ये भारताने अमेरिकेला ३.३ दशलक्ष आयफोन पाठवले, जे वार्षिक आधारावर ७६% वाढ दर्शवते तर, चीनमधून फक्त ९००,०० युनिट्सवर निर्यात घसरली, असे कॅनालिसच्या आकडेवारीनुसार, जे आता मार्केट रिसर्च फर्म ओमडियाचा भाग आहे स्पष्ट होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात वाढत्या व्यापार तणाव आणि चिनी आयातींवर मोठ्या प्रमाणात कर लादण्यात आल्याने बदल घडले आहेत.

ट्रम्प यांचा अ‍ॅपलला इशारा
अ‍ॅपलने त्यांचे फोन अमेरिकेत बनवावेत, असे ट्रम्प यांना वाटले पण अ‍ॅपल भारतातून फोन पाठवत आहेत. कंपनीला चीनवरील अवलंबित्व कमी करायचे आहे म्हणूनच त्यांचे उत्पादन चीनबाहेर हलवत आहे. डे्िरं नुसार एप्रिलमध्ये चीनमधून अमेरिकेत आयफोन निर्यात ७६% कमी झाली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये चीनने ३.७ दशलक्ष आयफोन पाठवले होते पण,यावर्षी त्यांनी फक्त ९ दशलक्ष आयफोन निर्यात केले.

आयफोन निर्यात सुमारे २९ ते ३० लाख
एप्रिलमध्ये भारताची अमेरिकेला आयफोन निर्यात सुमारे २९ ते ३० लाख होती पण, एप्रिलचे आकडे मार्चपेक्षा कमी आहेत. ऍपलने मार्चमध्ये जास्त फोन पाठवले कारण अमेरिकेने ज्या देशांशी व्यापार तूट होती त्यांच्यावर जास्त कर लादले होते, ज्याचा सर्वाधिक परिणाम चीनवर झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR