21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeउद्योगमध निर्यातीत भारत जगात नवव्यास्थानी

मध निर्यातीत भारत जगात नवव्यास्थानी

न्यूझीलंड अव्वलस्थानी, कमावतो २७५ कोटी भारतातही मधाचा वापर वाढला

ऑकलंड : जगातील अनेक देश मोठ्या प्रमाणात मधाचे उत्पादन करतात. पण जगात सर्वांधिक मध उत्पादन करणारा देश न्यूझीलंड आहे. छोटासा असणारा न्यूझीलंड हा देश मध उत्पादन आणि निर्यातीत आघाडीवर आहे. हा देश सुमारे २७५ कोटी रुपयांचा मध निर्यात करतो. भारतातही मधाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असून भारत नवव्यास्थानी आहे. मध उत्पादनात अनेक देश आघाडीवर आहेत.

भारतात मधाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण मध निर्यातीच्या बाबतीत भारत जगात ९ व्या क्रमांकावर आहे. देशातील उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, बिहार आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये मधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. जगात सर्र्वांधिक मध निर्यात न्यूझीलंड करतो. या छोट्या देशाने २०२२ मध्ये ३३३.३४ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २७५ कोटी रुपयांचा मध निर्यात केला. जगातील नैसर्गिक मध निर्यातीत न्यूझीलंडचा वाटा सुमारे १२ टक्के आहे. मनुका मध निर्यात करणारा न्यूझीलंड हा जगातील एकमेव देश आहे. मधमाशा हा मध विशेष प्रकारच्या फुलापासून बनवतात. यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात. या कारणास्तव, जगभरातील अनेक देशांमध्ये याला मोठी मागणी आहे. ते खूप महाग विकले जाते. भारतात, त्याच्या ३५० ग्रॅम पॅकची किंमत सुमारे ४,००० रुपये आहे. न्यूझीलंडच्या एकूण मध निर्यातीच्या कमाईमध्ये मनुका मधाचा वाटा ८२ टक्के आहे.

आघाडीवर असणारे देश कोणते?
मध निर्यातीच्या बाबतीत न्यूझीलंडनंतर चीनचा दुसरा क्रमांक लागतो. चीन दरवर्षी सुमारे २२९.६ दशलक्ष डॉलर्सचा मध निर्यात करतो. चीनमध्ये दरवर्षी ५००,००० टन मधाचे उत्पादन होते. जगातील एकूण मध उत्पादनापैकी एक चतुर्थांश मधाचे उत्पादन चीनमध्ये होते. या यादीत अर्जेंटिना तिस-या क्रमांकावर आहे. या देशाने २०२० मध्ये १७९.५ दशलक्ष डॉलर किमतीचा मध निर्यात केला. या देशातून दरवर्षी सुमारे ७५००० टन मधाची निर्यात होते. अर्जेंटिनातील मध हा उच्च दर्जाचा मानला जातो. युरोपीय देश जर्मनी आणि युक्रेन हेही मध निर्यात करणा-या पहिल्या पाच देशांमध्ये आहेत. यानंतर स्पेन, ब्राझील आणि हंगेरीचा क्रमांक लागतो. मध निर्यातीत भारतात ९ वा क्रमांक लागतो. त्यानंतर व्हिएतनामचा क्रमांक लागतो.

भारतात किती उत्पादन?
या यादीत भारत नवव्या क्रमांकावर आहे. भारताने २०२० मध्ये ८७.५६ दशलक्ष डॉलर किमतीचा मध निर्यात केला. राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या मते, २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताने १५५००० टन मधाचे उत्पादन केले. भारतात उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये सर्वांधिक मधाचे उत्पादन होते. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी, बहराइच, सिद्धार्थ नगर आणि बस्तीमध्ये मधाचे सर्वांधिक उत्पादन होते. गुजरातमधील खेडा, आनंद आणि वडोदरा, पंजाबमधील लुधियाना, जालंधर आणि अमृतसर, बिहारमधील वैशाली, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूर आणि मध्य प्रदेशातील उज्जैन, इंदूर आणि देवास येथे मधाचे उत्पादन केले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR