गुवाहाटी : भारतीय कसोटी क्रिकेटला गेल्या काही मालिकांपासून ग्रहण लागले आहे. देशात खेळलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताची दैना झाली आहे. न्यूझीलंडने क्लिन स्विप दिल्यानंतर आता दक्षिण अफ्रिका देखील त्याच मार्गावर आहे. दक्षिण अफ्रिका घरच्या मैदानावर ९३ वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आणून इतिहास रचला आहे. एखाद्या संघाने भारतासमोर ५४८ धावांचे लक्ष्य ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
९३ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात भारताला चौथ्या डावात कधीच इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागला नाही. दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला आणि इतके मोठे लक्ष्य ठेवले. भारतीय गोलंदाजांच्या नामुष्कीमुळे इतके मोठे लक्ष्य ठेवण्यात दक्षिण अफ्रिकेला यश आले आहे. २००४ मध्ये नागपूर येथे झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर ५४२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. घरच्या मैदानावर चौथ्या डावात संघाने दिलेले हे सर्वोच्च लक्ष्य होते. आता दक्षिण आफ्रिकेने २१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेने २८८ धावांची आघाडी घेतली होती. तर दुस-या डावात अगदी २६० धावा केल्या आणि डाव घोषित केला. ५४८ धावांसह दक्षिण आफ्रिकेने भारतात चौथ्या डावात दिलेले सर्वोच्च लक्ष्य करण्याचा विक्रम केला आहे. या धावांचा पाठलाग करून विजय मिळवणे खूपच कठीण आहे. कारण शेवटच्या डावात फक्त एकदाच ५०० हून अधिक धावांचा पाठलाग करण्यात यश आले होते. १९३९ मध्ये दक्षिण अफ्रिकेने ६९६ धावांचे लक्ष्य ठेवले तेव्हा इंग्लंड ६५६ धावा केल्या आणि हा सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे भारतीय संघ विजय तर मिळवणार नाही हे निश्चित आहे. पण ड्रॉ करणेही कठीण दिसत आहे.

