मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २९९ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताने ५० षटकांत ७ गडी गमावून २९८ धावा केल्या आणि विजयासाठी २९९ धावांचे लक्ष्य दिले आहे.
शेवटच्या चेंडूवर राधा यादव स्ट्राईकला होती. तिने फटका मारला आणि धावत सुटली. पण दोन धावा घेताना दीप्ती शर्मा ५८ धावा करून रनआऊट झाली. आता भारतीय गोलंदाजांपुढे दक्षिण अफ्रिकेला रोखण्याचे आव्हान असणार आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या नव्या विजेत्याचा निकाल ५० षटकांच्या उर्वरित सामन्यात लागणार आहे.

