नवी दिल्ली : २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे एस अॅन्ड पी ग्लोबल रेटिंग्सचे म्हणणे आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ७% पर्यंत पोहोचेल असा अंदाज एजन्सीने व्यक्त केला आहे.
ग्लोबल क्रेडिट आउटलुक २०२४ मध्ये, एस अॅन्ड पीने लिहिले की आमचा विश्वास आहे की भारताचा जीडीपी वाढीचा दर २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६.४% असेल. तर आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जीडीपी वाढीचा दर ६.९% पर्यंत पोहोचेल. एजन्सीने पुढे लिहिले की, भारत २०३० पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि आमची अपेक्षा आहे की प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी भारत पुढील तीन वर्षांसाठी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल.
सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताच्या पुढे अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान आहेत. रेटिंग एजन्सी मूडीजने मंगळवारी चीनच्या अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन स्थिर वरून नकारात्मक केला. याचे कारण आर्थिक वाढीत घसरण आणि मालमत्ता क्षेत्रात घसरण होत आहे. एजन्सीने चीनचे एकूण रेटिंग एआय वर कायम ठेवले आहे.