33.8 C
Latur
Sunday, May 11, 2025
Homeक्रीडाभारताचा ४३४ धावांनी विजय

भारताचा ४३४ धावांनी विजय

मालिकेत २ - १ ने घेतली आघाडी

राजकोट : भारताने तिस-या कसोटीत इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव करत मालिकेत २ – १अशी आघाडी घेतली. भारताने ५५७ धावांचे आव्हान ठेवल्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव १२२ धावात गुंडाळला. रविंद्र जडेजाने ५ तर कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या. अश्विन आणि बुमराहने प्रत्येकी १ विकेट घेतली.

भारताने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. रविंद्र जडेजाने शतकी खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावात संपवला. बेन डकेटने १५३ धावांची धडाकेबाज खेली केली होती. त्यानंतर यशस्वी जैस्वालच्या २१४ धावांच्या जोरावर भारताने दुस-या डावात ४३० धावा केल्या. इंग्लंडसमोर विजयासाठी ५५७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र इंग्लंडचा संघ १२२ धावात गारद झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR