36.8 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeराष्ट्रीयभारतीय ‘अ‍ॅप्स्’ना ‘गुगुल प्ले’वरून हटविले

भारतीय ‘अ‍ॅप्स्’ना ‘गुगुल प्ले’वरून हटविले

गुगलने केली कारवाई शादी डॉट कॉम, कुकू एफएम, अल्ट बालाजीचा ही समावेश

नवी दिल्ली : गुगलने कित्येक भारतीय ऍप्सवर मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारपासून हे ऍप्स आपल्या प्ले-स्टोअरवरुन हटवण्यास गुगलने सुरूवात केली होतीे. यामध्ये भारत मॅट्रिमॉनी, शादी डॉट कॉम, कुकू एफएम, अल्ट बालाजी अशा प्रसिद्ध ऍप्सचा देखील समावेश आहे. सर्व्हिस फी न दिल्यामुळे ही कारवाई केली जात असल्याचे गुगलकडून सांगण्यात आले.

कित्येक प्रस्थापित ऍप्सना प्ले-स्टोअरकडून भरपूर फायदा झाला आहे. मात्र त्यांनी सर्व्हिस फी दिलेली नाही असे गुगलने म्हटले. ही फी आधी १५ ते ३० टक्के एवढी होती. मात्र, अँटी कॉम्पीटिशन बॉडी सीसीआयने दिलेल्या आदेशांनंतर ही फी ११ ते २६ टक्के करण्यात आली होती. गुगलच्या प्लॅटफॉर्म फी बाबत कित्येक ऍप्सनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने कंपन्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर गुगलने ही कारवाई केली आहे.

भारतातील इंटरनेटसाठी काळा दिवस
गुगलच्या या कारवाईवर भारतीय ऍप्सनी नाराजी व्यक्त केली आहे. गुगलने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक ऍप्स हटवण्यास सुरुवात केली असल्याचं कंपन्यांचे म्हणणे आहे. भारत मॅट्रिमॉनीचे फाऊंडर मुरुगावेल जानकीरामन यांनी हा दिवस भारतातील इंटरनेटसाठी काळा दिवस असल्याचे म्हटले. कुकू एफएमचे को-फाऊंडर विनोद कुमार मीना म्हणाले, की गुगल एका मोनोपॉलीप्रमाणे काम करत आहे. जीवनसाथीच्या इन्फो एज कंपनीचे संस्थापक संजीव बिकाचंदानी म्हणाले, की त्यांनी वेळेवर गुगलला सगळी फी भरली असूनही ही कारवाई करण्यात आली. तर, क्वॅकक्वॅक ऍपचे फाऊंडर रवी मित्तल यांनी सांगितले की कंपनी गुगलने दिलेल्या नियमांचे पालन करेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR