22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरमहिलांचा सन्मान करणे भारतीय संस्कृती

महिलांचा सन्मान करणे भारतीय संस्कृती

सोलापूर: आज प्रत्येत क्षेत्रात महिलांचे वर्चस्व बाढत असून त्या महिलांचा सन्मान करणे हीच भारतीय संस्कृती आहे, असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त सुंदर मल्टिपर्पज हॉल, नेहरूनगर येथे दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ, महिला आघाडी यांच्यावतीने महिला मेळावा पेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे राज्य सल्लागार बाळासाहेब काले होते. याप्रसंगी सहा. पोलिस उपायुक्त प्रांजली सोनवणे-पोळ, ज्येष्ठ नेते उत्तम मदाडे,गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, हरिश राऊत, जयश्री सुतार, गुरुराज सनके, राम यादव, सरस्वती भालके उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्याविविध स्पर्धा घेण्यात आल्या. सिद्राम कटगेरी, दधानंद बठारे, राजकुमार बिन्वागी, सुनील बिराजदार, विनोद कोळी, प्रकाश कुंभार, रेवणसिद्ध हत्तुरे, मल्लिनाथ पुजारी, भीमराव पाटील, डॉ. नागनाथ येवले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अंजली जमखंडीकर यांनी केले. विद्या जगताप यांनी आभार मानले. तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून एक तसेच उर्दु व कन्नड माध्यमातून प्रत्येकी एक, अशा एकूण पंधरा महिला-भगिनींचा ‘आधुनिक हिरकणी’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR