भारतीय जेवण रुचकर परंतू आरोग्यासाठी हानिकारक

नवी दिल्ली : भारतीय लज्जतदार जेवण त्याच्या स्वादासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. परंतू इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) एका नवीन अहवालाने भारतीय जेवणातील पदार्थ रुचकर असले तरी आरोग्यासाठी पोषक नाहीत असे म्हटले आहे. भारतीय आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूपच जास्त प्रमाणात आहे आणि त्यात प्रोटीनचे प्रमाण खूपच कमी असल्याचे म्हटले आहे.

भारतीय आहारामुळे शरीराचे फारसे पोषण होत नाही. उलट या आहाराने देशातील लठ्ठपणा आणि डायबिटीजचे प्रमाण वाढत चालले आहे. आणि स्रायू कमजोर होत चालले असल्याचे आसीएमआरच्या अहवालात म्हटले आहे. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ न्यूट्रीशनच्या वतीने केलेल्या या संशोधनात भारतीय लोकांच्या डाएटचे विश्लेषण केले गेले. त्यानुसार झालेल्या संशोधनात असे आढळले की लोकांचे पोट तर या आहाराने भरले जाते. परंतू शरीराला आवश्यक पोषण त्यातून मिळत नाही.

अहवालानुसार रिपोर्टमध्ये हे समोर आले की भारतीय आहारात ६५ ते ७० टक्के कार्बोहायड्रेट असते. तर प्रोटीनचे प्रमाण केवळ १० टक्के असते. या अहवालानुसार भारतीय जेवणातील थाळीत भात, रोटी आणि बटाट्यासारखे कार्बोहायड्रेट पदार्र्थ प्रचंड प्रमाणात खाल्ले जातात.आयसीएमआरच्या मते त्यांच्या जास्त प्रमाणामुळे शरीरातील साखरेची पातळी खूप वाढते आणि फॅट जमा होते. त्यामुळे वजन वाढणे, थकवा येणे आणि डायबिटीजसारखे आजार होतात.

प्रोटीनच्या कमतरतेने कमजोरी
रिपोर्टनुसार प्रत्येक व्यक्तीला रोज ६० ग्रॅम प्रोटीनची गरज असते. परंतू बहुतांशी भारतीयांच्या जेवणात केवळ ३५ ते ४० ग्रॅम प्रोटीन असते. डाळ, दूध, अंडी आणि सोयासारखे पदार्थ भारतीय ताटातून गायब आहेत. त्याचा परिणाम इम्युनिटी आणि मसल स्ट्रेन्थवर होत आहे. आयसीएमआरच्या रिसर्चनुसार दक्षिण भारतीय लोक तांदूळावर अवलंबून असतात.तर उत्तर भारतात गहूचा वापर सर्वाधिक होतो. तूर पूर्वोत्तर राज्ये आणि किनारी प्रदेशात मासे आणि नारळाने थोडे चांगले प्रोटीन मिळते. परंतू एकूण संपूर्ण देशाच्या डाएट संतुलनाचा अभाव आहे.

आयसीएमआरचा इशारा
आयसीएमआरने लोकांना आपल्या डाएटमध्ये सुधार करण्याचा इशारा दिला आहे. अहवालानुसार लोकांनी त्यांच्या डाएटमध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅटचा समावेश केला नाही तर येणा-या काळात आजारांचे प्रमाण वाढेल. आयसीएमआरने सल्ला दिला आहे की थाळीत २५ टक्के प्रोटीन, ५० टक्के कार्ब्स आणि २५ टक्के हेल्दी फॅटचे संतुलन राखणे गरजेचे आहे. तुम्ही रोज थाळीत डाळ, दूध, अंडी आणि दही सोया आणि भाज्यांचा समावेश करु शकता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news