22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयभारतीय नेत्यांना हवे परदेशी हेलिकॉप्टर्स आणि पायलट्स

भारतीय नेत्यांना हवे परदेशी हेलिकॉप्टर्स आणि पायलट्स

पुणे : देशातील हे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. पुढील दोन महिन्यात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक मोठी प्रतिष्ठेची आणि आव्हानांची असणार आहे. भाजप आणि काँग्रेससहित इतर विरोधी पक्षांची इंडिया आघाडी अशी ही थेटपणे लढत होणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची खूपच पळापळ होणार आहे.

यापार्श्वभूमीवर वेळ वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे यंदाच्या या निवडणूक हंगामात परदेशी हेलिकॉप्टर्स आणि पायलट्सना मोठी मागणी आहे. त्यांचा तासाभराचा उड्डाणाचा दर ऐकूनही तुम्ही आवाक् व्हाल. भारतातील सार्वत्रिक निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक असते. त्यासाठी नेत्यांना जलद आणि आरामदायी प्रवासासाठी हेलिकॉप्टरची गरज भासते. पण भारतात अनुभवी हेलिकॉप्टर पायलट्सची कमतरता आहे. यापार्श्वभूमीवर परदेशातील हेलिकॉप्टर्स अन् पायलट्सना मागणी वाढली आहे. यापार्श्वभूमीवर हेरिटेज एव्हिएशनचे व्यवस्थापकीय संचालक रोहित माथूर सांगतात, भारतातील हेलिकॉप्टर इंडस्ट्री ही सध्या भारतीय हवाई दलातील माजी पायलट्सवर अवलंबून आहे. तसेच काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशी हेलिकॉप्टर चालक प्रशिक्षण संस्था सोडल्यास याची देखील वानवाच आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पायलट्सचा पुरवठा खूपच कमी आहे.

पायाभूत सुविधांचा अभाव
आपल्याकडे हेलिकॉप्टर इंडस्ट्री ही खूपच मोठी इंडस्ट्री व्हायला हवी. पण यासाठी लागणा-या पायाभूत सुविधा आणि नियमनातील संकुतिचपणा हा याला मारक ठरत आहे असे रोटरी विंग सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल एएस बुटोला यांनी म्हटले आहे.

दिवसभरात किमान २-३ तासांचे उड्डाण गरजेचे
ग्लोबल व्हेक्ट्रा हेलिकॉर्प्स या कंपनीने सांगितले की आमच्याकडे ३२ हिलिकॉप्टर्सची फ्लीट आहे. राजकीय सभांसाठी आम्ही हेलिकॉप्टर्सची सेवा पुरवतो. ब-याचदा आमच्याकडील हेलिकॉप्टर्स ही सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बुक होतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR