नवी दिल्ली : बीसीसीआयने भारताच्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार टी २० सामन्यांची मालिका होणार आहे. तर, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर जाणार आहे. भारताच्या टी २० संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव आहे. तर, रोहित शर्मा भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे.
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकूसिंग, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार व्यषक, आवेश खान, यश दयाल, मयंक यादव आणि शिवम दुबे हे दोघे दुखापतग्रस्त असल्याने त्यांना संघात स्थान देण्यात आले नाही. तर, रियान पराग देखील दुखापतग्रस्त असल्यानं त्याला संघात स्थान मिळाले नाही, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी २० मालिका ८ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ८ नोव्हेंबर, १०, १३ आणि १५ तारखेला चार टी २० सामने होणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका टी २० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीतील लढतीनंतर पहिल्यांदा आमने सामने येणार आहेत.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी
रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमरहा (उपकॅप्टन), यशस्वी जयस्वाल , अभिमन्यू इश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जरेल (विकेटकपीर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर,
राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि खलील अहमद