23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeक्रीडाभारतीय महिला संघाने नोंदवला सलग तिसरा विजय

भारतीय महिला संघाने नोंदवला सलग तिसरा विजय

बंगळूरू : भारतीय महिला संघाने तिस-या व शेवटच्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ६ विकेट्स व ५६ चेंडू राखून दणदणीत विजय नोंदवला. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या तिस-या सामन्यात पुन्हा एकदा स्मृती मानधनाचे वादळ पुन्हा घोंगावले, परंतु तिला ऐतिहासिक शतकापासून थोडक्यासाठी मुकावे लागले. स्मृतीने ८३ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ९० धावांची खेळी केली. भारतीय महिला संघाने २१६ धावांचे लक्ष्य ४०.४ षटकांत सहज पार केले.

दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्• ( ६१) आणि तझमिन ब्रिट्स ( ३८) यांनी चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु भारतीय गोलंदाजांनी मधल्या फळीला झटपट गुंडाळले. नॅदीने डी क्लेर्क ( २६) व मिएके डे रिडर ( २६) यांच्या योगदानामुळे आफ्रिकेने ८ बाद २१५ धावांपर्यंत मजल मारली. भारताच्या अरुंद्धती रेड्डी व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात स्मृती व शफाली वर्मा यांनी ६१ धावांची भागीदारी केली. शफाली २५ धावांवर माघारी परतली. त्यानंतर आलेली प्रिया पुनिया ( २५) हिनेही स्मृतीसह ६२ धावा जोडल्या.

स्मृती व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनीही ४८ धावा जोडल्या. मागील दोन सामन्यांत शतक झळकावणारी स्मृती ८३ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ९० धावांवर बाद झाली. आज तिने शतक झळकावले असते तर ती वन डे क्रिकेटमध्ये सलग तीन शतकं झळकावणारी पहिली आशियाई खेळाडू बनली असती. पण, तिने एकाच मालिकेत सर्वाधिक ( किमान ३ इंिनग्ज) धावा करण्याचा विक्रम स्मृतीने नावावर केला. तिने या मालिकेत ३४३ धावा केल्या आहेत आणि टॅमि बियूमोंट ( ३४२ वि. पाकिस्तान, २०१६) हिचा विक्रम मोडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR