नवी दिल्ली/श्रीनगर : भारताकडून दहशतवाद्यांना टार्गेट केले जाण्याची भीती पाकिस्तानला असल्याने त्यांनी सर्व दहशतवाद्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. भारताने सलाल धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानवर जल, थल, आणि आकाश या सर्व मार्गांनी भारताकडून आक्रमण झालेले आहे.
त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडालेली आहे. काल रात्री भेदरलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागांना निशाणा बनवत ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न भारतीय लष्कराने पुरता हाणून पाडला आहे. त्यानंतर भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांतने कराची बंदरावर सर्वात मोठा हल्ला केला.
दरम्यान या सगळ्यात पाकिस्तानला सामान्य नागरिकांपेक्षा दहशतवाद्यांची जास्त काळजी असल्याचे बघायला मिळाले आहे. भारताकडून दहशतवाद्यांना टार्गेट केले जाण्याची भीती पाकला असल्याने पाकिस्तानने सगळ्या दहशतवाद्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.