नवी दिल्ली : आजच्या आधुनिक काळात सर्वचजण इंटरनेटचे महत्त्व जाणतात. जगभरात इंटरनेट मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यात सुद्धा मोबाईल इंटरनेटचा वापर सर्वांसाठी सोयीचे झाला आहे. मोबाईल इंटरनेटमुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. परंतु, वेगवेगळ्या देशात मोबाईल इंटरनेटच्या वेगात अंतर पाहायला मिळते, म्हणजेच प्रत्येक देशात मोबाईल इंटरनेटचा वेग हा एकसारखा नसतो. मध्य पूर्व आणि एशियातील ब-याच देशात मोबाईल इंटरनेटचा वेग हा अधिक आहे. तसेच यूएई, कतार सारख्या देशात सुद्धा इंटरनेट जास्त वेगाने चालते. याउलट अमेरिका आणि आपल्या भारतात मात्र इंटरनेटचा वेग हा कमी आहे. तर प्रामुख्याने भारतात इंटरनेटचा स्पीड जगाच्यसा तुलनेत निम्म्यापेक्षा कमी आहे. या देशांमध्ये अजुनसुद्धा वेगवान इंटरनेटची समस्या आहे. आजही अमेरिका आणि भारतासारख्या देशात इंटरनेटच्या सुविधांचा आभाव पाहायला मिळतो.
स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्सनुसार पूर्व मध्य आणि एशियातील देशांमध्ये वेगवान मोबाईल इंटरनेट चालते. यापैकी संयुक्त अरब अमिरात (युएई) हा मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत पूर्ण जगात सर्वात पुढे आहे. दुबई मध्ये मोबाईल इंटरनेटचा वेग हा जवळपास १०० पट वाढला आहे. २०१२ पासून युएईने डिजिटल इन्फ्रास्ट्रकचरमध्ये अधिक प्रमाणात पैशांची गुंतवणूक केल्याने या देशात सर्वात वेगवान इंटरनेट आहे. जगभरात चीन नंतर भारतात दुस-या क्रमांकाचे ऑनलाईन मार्केट आहे. भारतात ९०० दशलक्षाहून अधिक लोक इंटरनेट वापरतात.
भारतात इंटरनेटचा इतका जास्त वापर असून सुद्धा इंटरनेचा वेग हा इतर देशांच्या तुलनेत काहीसा कमी प्रमाणात असलेला दिसून येतो. भारतात इंटरनेटचा वेग हा जवळपास जगाच्या तुलनेत ५० टक्क्याहून अधिक कमी आहे. नोव्हेंबर २०२४ नुसार स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्स मध्ये जगभरात भारत हा मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत २५ व्या क्रमांकावर आहे. भारतात सरासरी डाऊनलोड स्पीड ही १००.७८ एमबीपीएस अपलोड स्पीड ९.०८ एमबीपीएस तसेच लेटेंसी ही ३० एमएस इतकी आहे. भारतात इंटरनेटचा वेग जरी कालांतराने वाढताना दिसत असला तरी तो कित्येक विकसित देशांच्या तुलनेत मागे आहे. भारत हा इन्फ्रास्ट्रकरशी निगडीत ब-याच आव्हानांना सामोरे जात असल्याकारणाने डिजिटल वेग मंदावलेला पाहायला मिळतो.
क्रमांक देश एमबीपीएस
१ संयुक्त अरब अमिरात ४४२
२ कतार ३५८
३ कुवेत २६४
४ बल्गेरीया १७२
५ डेनमार्क १६२
६ दक्षिण कोरिया १४८
७ नेदरलँड १४७
८ नॉर्वे १४५.७४
९ चीन १३९.५८
१० लक्झेंबर्ग १३४.१४