29.6 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeक्रीडाभारताचा सहा गड्यांनी दणदणीत विजय

भारताचा सहा गड्यांनी दणदणीत विजय

मोहाली : शिवम दुबेच्या झंझावाती अर्धशतकाच्या बळावर पहिल्या टी 20 सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा सहा विकेटनं पराभव केला. शिवम दुबे याने 40 चेंडूत 60 धावांची खेळी केली. त्याशिवाय जितेश शर्मा यानेही 20 चेंडूत 31 धावांचं मोलाचं योगदान दिलं. अफगाणिस्तानकडून मुजीब आर रहमान याने दोन विकेट घेतल्या. मोहाली टी 20 सामन्यात विजय मिळवत तीन सामन्याच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली.

अफगाणिस्तानने दिलेल्या 159 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा एकही धाव न करता तंबूत परतला. रोहित शर्मा धावबाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि शुभमन गिल यांनी डाव सावरला. पण ठरावीक अंतराने भारताने विकेट फेकल्या. शुभमन गिल 12 चेंडूत 23 धावा काढून बाद झाला. त्याने पाच चौकारांच्या मदतीने 23 धावांचे योगदान दिले. तिलक वर्मा याने 22 चेंडूत 26 धावा केल्या. यामध्ये दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तिलक वर्मा आणि शुभमन गिल ठराविक अंतराने बाद झाल्यानंतर शिवम दुबे आणि जितेश शर्मा यांनी डाव सावरला. दोघांनी मोठे फटके मारत वेगानं धावसंख्या वाढवली.

शिवम दुबे याने 40 चेंडूत नाबाद 60 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. जितेश शर्माने याने 20 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 31 धावा जोडल्या. फिनिशर रिंकू सिंह याने 9 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब आर रहमान याने दोन विकेट घेतल्या. तर उमरजई याला एक विकेट मिळाली. फारुखी, नबी, नवीन यांची विकेटची पाटी कोरीच राहिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR