अबुदाबी : दुबई एअर शोदरम्यान मोठा अपघात घडला असून एअर शो सुरू असताना भारतीय बनावटीचे तेजस लढाऊ विमान क्रॅश झाले आहे. एअर शो सुरू असताना हे विमान क्रॅश होऊन वेगाने खाली आले, घटनास्थळी धूर आणि आगीचे लोळ उठल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या विमानाच्या पायलट ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी दुबईमध्ये सुरू असलेल्या एअर शोदरम्यान हा अपघात घडला आहे, स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी हा अपघात घडला आहे.
एअर शो सुरू असतानाच ही दुर्घटना घडली आहे. हे विमान अचानक जमिनीच्या दिशेने तीव्र वेगात खाली आले आणि कोसळले. घटनास्थळावरून मोठे आगीचे आणि धुराचे लोट उठल्याचे पाहायला मिळाले. घटनेबाबत अधिक माहिती अशी की एअर शो सुरू असतानाच हा अपघात घडला आहे, तेजस हे भारताचे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान आहे. या विमानाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तेजस असं नाव दिले होते.
या अपघातात भारतीय बनावटीचे लढाऊ विमान कोसळल्याने हा आता भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान हा एअर शो पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, यामध्ये लहान मुलांचादेखील मोठ्या संख्येने समावेश होता. अपघात होताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. गर्दीला अपघात स्थळापासून पांगवण्यात आले आहे. दरम्यान या विमानात असलेल्या पायलटबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाहीये, त्याचा शोध सुरू आहे.
तेजस एमके१ मधून इंधनाच्या गळतीची सत्यता
दुबई एअर शोचा एक व्हीडीओ चांगलाच व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तेजस एमके१ मधून इंधनाची गळती होत असल्याचे दिसून येत होते, मात्र हा व्हीडीओ बनावट असल्याचे फॅक्ट चेकमधून समोर आले होते.

