22.9 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeक्रीडाभारताचे ऑस्ट्रेलियाला २०६ धावांचे तगडे आव्हान

भारताचे ऑस्ट्रेलियाला २०६ धावांचे तगडे आव्हान

ग्रॉस आयलेट : रोहित शर्माने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर 8 मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गाजवला. त्याने मिचेल स्टार्कच्या षटकात कुटलेल्या २९ धावा ऑसींच्या मनात धडकी भरवणा-या ठरल्या. त्यानंतर मैदानावर फक्त रोहितचा जलवा दिसला आणि त्याने ४१ चेंडूंत ९२ धावांची स्फोटक खेळी केली. हिटमॅनचे शतक हुकल्याची खंत चाहत्यांमध्ये दिसली. रोहितने उभ्या केलेल्या मजबूत पायावर भारतीय फलंदाजांनी धावांचे इमले रचले आणि ऑस्ट्रेलियासमोर २०६ धावांचे तगडे लक्ष्य उभे केले.

वन डे वर्ल्ड कप फायनलचा सर्व राग रोहित ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर काढला. विराट कोहली शून्यावर बाद झाल्यानंतर रोहितने अचानक गिअर बदलला आणि मिचेल स्टार्कच्या एका षटकात २९ धावा कुटल्या. हिटमॅनची फटकेबाजी पाहून ऑसी गोलंदाज हैराण झाले आणि त्यांचे सर्व डावपेच भारतीय कर्णधाराने नेस्तनाबुत केले. रोहितने १९ चेंडूंत वेगवान अर्धशतक पूर्ण केले आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी नोंदवली. रोहित व रिषभ पंत ( १५) यांनी ३८ चेंडूंतील ८७ धावांची भागीदारी केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये रोहितने २०१० मध्ये रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ७९ धावा करून त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली होती.

१५ षटकांत भारताच्या ४ बाद १६२ धावा होत्या आणि शेवटच्या ५ षटकांत हार्दिक व शिवम यांनी अपेक्षित फटकेबाजी केली. शिवम २२ चेंडूंत २८ धावांवर झेलबाद झाला. हार्दिकने १७ चेंडूंत २७ धावा चोपल्या आणि भारताला ५ बाद २०५ धावा केल्या. भारताला शेवटच्या ५ षटकांत ४३ धावा केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR