22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयभारताचे यूपीआय झाले ग्लोबल

भारताचे यूपीआय झाले ग्लोबल

नवी दिल्ली : भारतीय पेमेंट सिस्टम यूपीआयला (यूपीआय) देशांतर्गत तसेच जागतिक स्तरावर चांगले यश मिळत आहे. अलीकडेच मॉरिशस आणि श्रीलंकेमध्ये यूपीआय लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे यूपीआयचा वापर करणा-या देशांची संख्या आता १० च्या पुढे गेली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात फ्रान्समध्ये यूपीआय सुरू करण्यात आले होते. यामुळे तुम्हाला पॅरिसमधील आयफेल टॉवरची तिकिटे सहज खरेदी करता येऊ शकतात.

श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूपीआय सेवेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ंिहदी महासागर क्षेत्रातील तीन मित्र देशांसाठी आजचा दिवस खास आहे. मला विश्वास आहे की श्रीलंका आणि मॉरिशसला यूपीआय सिस्टमचा फायदा होईल. तसेच, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांनी भारतात क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. यूपीआय भारतासोबत भागीदारांना एकत्र आणण्याची नवीन जबाबदारी घेत आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले होते. दरम्यान, यूपीआयमुळे विदेशात व्यवहार करण्याचा थेट फायदा भारतीय लोकांना होईल. कोणत्याही त्रासाशिवाय विदेशात सहज व्यवहार करू शकतीत. यामुळे विदेशी मुद्रा शुल्क देखील कमी होईल, परिणामी देशातील लोकांसाठी विदेशातील व्यवहार स्वस्त होतील.

काय आहे यूपीआय?
यूपीआय ही भारतीय पेमेंट सिस्टम आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीने ते विकसित केले आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे पेमेंट करण्यासाठी डळढ ची गरज नाही. तुम्ही फक्त पिन टाकून सहज पेमेंट करू शकता.

कोणत्या देशात सुरु आहे यूपीआय?
भूतान, मलेशिया, यूएई, सिंगापूर, ओमान, कतार, रशिया, फ्रान्स, श्रीलंका, मॉरिशस

कोणत्या देशात होणार यूपीआय?
भारत सरकार इतर देशांमध्ये देखील यूपीआय लाँच करण्यासाठी चर्चा करत आहे. यामध्ये ब्रिटन, नेपाळ, थायलंड, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, बहरीन, जपान आणि फिलिपाइन्स या देशांच्या नावांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR