वॉशिंग्टन : अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वाढतच आहेत. रविवारी संध्याकाळी न्यूयॉर्कमधील रोचेस्टर येथील एका सार्वजनिक ठिकाणी गोळीबार झाला. यात एक जणाचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. कमळालेल्या माहितीनुसार, मॅपलवुड पार्कमध्ये अनेक लोक आपल्या कुटुंबियांसोबत हवामानाचा आनंद घेत असताना अचानक अंदाधुंद गोळीबार झाला. यामुळे एकच गोंधळ उडाला. या गोळीबारीनंतर पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे.
रोचेस्टर पोलिसांचे म्हणणे आहे की हल्लेखोराची अद्याप ओळख पटलेली नाही, परंतु एकापेक्षा जास्त जण असण्याची शक्यता आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये गोळीबारानंतर पार्कमध्ये गोंधळाचे वातावरण दिसत आहे आणि गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे.
काही दिवसांपूर्वी पेनसिल्वेनियामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत ही गोळीबार झाला होता. यात एक ट्रम्प समर्थकाचा मृत्यू झाला होत यामुळे अमेरिकेतील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत.