18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रहळदी पिकावर ‘करपा’चा प्रादुर्भाव

हळदी पिकावर ‘करपा’चा प्रादुर्भाव

उत्पादनात घट; शेतकरी त्रस्त

पुणे : सतत होणा-या वातावरणातील बदलाचा परिणाम हळदीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली जाते. शेतकरी या हळदीच्या पिकाला वर्षभर जपत असतात.

परंतु, हेच शेतकरी आता संकटात सापडले आहेत. कारण हळदीच्या पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे हळदीच्या उत्पादनात २५ ते ५० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे.

भारतात सर्वाधिक हळदीच्या पिकाचे उत्पन्न घेणारा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे. हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात हळदीचे पीक घेतले जाते. मात्र हळदीचे उत्पन्न घेणारे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्याचं कारण म्हणजे वातावरणात होणा-या बदलामुळे हळदीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.

उभे हळदीचे पीक शेतक-यांच्या डोळ्यासमोर करपत आहे. विशेष म्हणजे याचा परिणाम हळदीच्या पिकाच्या उत्पन्नावर देखील होणार आहे. ज्यातून २५ ते ५० टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. याचा थेट आर्थिक फटका हळदी उत्पादक शेतक-यांना बसणार आहे.

वातावरणात सतत बदल
मागील काही दिवसांत वातावरणात सतत बदल होत आहे. कारण हिवाळा सुरू असतानाच अचानक अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे वातावरणात होणा-या बदलाचे परिणाम पिकांवर देखील होताना पाहायला मिळत आहेत. रबी हंगामातील अनेक पिकांना याचा फटका बसत आहेत. सोबतच हळदीच्या पिकाला देखील याचा फटका बसताना पाहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR