22.7 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeअंतरराष्ट्रीयकॅनडातून भारतीयांचीच अमेरिकेत डंकी मार्गाने घुसखोरी

कॅनडातून भारतीयांचीच अमेरिकेत डंकी मार्गाने घुसखोरी

अमेरिकेत गेल्यावर आयुष्य बदलेल असा समज सर्वाधिक १८ ते ३० वयोगटातील तरुण

वॉशिंग्टन : परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत हे डंकी या चित्रपटातून दिसून आले. डंकी मार्गांचा वापर सर्वाधिक गुजरात, पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यामधील नोकरीच्या शोधातील तरुणाकंडून केला जात आहे. घुसखोरीच्या प्रयत्नात जवळपास ९० हजार भारतीयांना अमेरिकेत अटक करण्यात आली असून यामधील निम्मे गुजरातमधील आहेत. अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेल्या दुस-या विमानातील सर्वाधिक १८ ते ३० वयोगटातील तरुण आहेत. घरदार विकून, जमीन विकून यांनी डंकी मार्गाचा अवलंब केला आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त ‘डंकी रूट’चा गौरव रिल्सच्या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे अनेकांना हा धोकादायक मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. आता टिकटॉकवर संबंधित एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे, जिथे कॅनडाचे ‘कोयोट्स’ (मानवी तस्कर) उघडपणे अमेरिकेत घुसखोरी करण्याची ऑफर देत आहेत. त्यांचा दावा आहे की ते फक्त ५००० डॉलर्समध्ये कोणत्याही त्रासाशिवाय ते अमेरिकेत पोहोचवत आहेत.

कसा सुरु आहे गोरखधंदा?
हे मानवी तस्कर विशेषत: भारतीय नागरिकांना लक्ष्य करतात. कॅनडामधून अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी त्यांना गुप्त मार्ग आणि नकाशे देखील दिले जात आहेत. न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनला जाण्यासाठी, मॉन्ट्रियल, ब्रॅम्प्टन (टोरंटोजवळ) आणि सरे (व्हँकुव्हरजवळ) येथून प्रवास सुरू होतो.

पोहोचल्यानंतर पैशाची मागणी
टिकटॉकवर डंकी रुट १०० टक्के सुरक्षित असल्याचा दावा करणा-या पोस्ट केल्या जातात. अमेरिकेत गेल्यावर तुमचे आयुष्य बदलेल. तुम्ही अशा ठिकाणी असाल जे स्वर्गापेक्षा कमी नाही. याशिवाय अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतरच पैसे द्यावेत, असेही त्यांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर तस्करांच्या खात्यांवर अशा लोकांचे रिव् ूही पाहायला मिळतात. पंजाबी भाषेत पोस्ट केलेल्या या व्हीडीओंमध्ये लोक सांगत आहेत की त्यांनी सीमा कशी सहज पार केली.

दररोज १०० भारतीय पकडले
२०२४ मध्ये आतापर्यंत अमेरिकेच्या उत्तर सीमेवरून दररोज सरासरी १०० भारतीय नागरिक पकडले गेले आहेत. गेल्या दोन वर्षांत ही संख्या तीन पटीने वाढली आहे. बहुतेक भारतीय विद्यार्थी व्हिसावर कॅनडामध्ये येतात, पण नंतर अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करतात.

कॅनडावर ट्रम्प नाराज
या तस्करीवर नाराजी व्यक्त करत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातून आयात होणा-या वस्तूंवर २५ टक्के शुल्क आकारण्याची धमकी दिली होती. सध्या, जस्टिन ट्रूडो सरकारने १०,००० सीमा रक्षक आणि ड्रोन पाळत ठेवण्याचे आश्वासन देऊन हा निर्णय ३० दिवसांसाठी स्थगित ठेवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR