28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयइनसॅट ३डीएसचे १७ फेब्रुवारी रोजी प्रक्षेपण

इनसॅट ३डीएसचे १७ फेब्रुवारी रोजी प्रक्षेपण

बंगळूरू : भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) यावर्षातील दुसरी महत्त्वाची मोहिम हाती घेतली आहे. इस्रोच्या हवामानविषयक उपग्रह इनसॅट-३डीएसचे शनिवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपण केला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३५ वाजता, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे, असे इस्रोने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून सांगितले आहे.

इस्रोच्या इनसॅट-३डीएस या हवामानविषयक उपग्रहाने बंगळूरमधील यूआर राव उपग्रह केंद्रात उपग्रह संयोजन, एकत्रीकरण आणि उपक्रम चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. तसेच पुढे इस्रोने वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, जीएसएलव्हीआयएस२च्या या १६ व्या मोहिमेत लक्ष्य निर्धारित केले आहे. इनसॅट-३डी हा उपग्रह हवामानशास्त्र आणि आपत्ती चेतावणीशी संबंधित आहे. या मोहिमेला संपूर्णपणे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून निधी दिला जाणार असल्याचे देखील इस्रोने स्पष्ट केले आहे.

इनसॅट ३ डीएस हा एक अद्वितीय हवामानशास्त्रीय उपग्रह आहे. ज्याचा प्राथमिक उद्देश सध्याच्या कक्षेत असलेल्या इनसॅट-३ डी आणि 3डीआर उपग्रहांना सेवांची सातत्यता प्रदान करणे. इनसॅट प्रणालीच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करणे आहे. इस्रोचा हा उपग्रह पृथ्वी विज्ञान मंत्रालयसह युजर्स अनुदानित प्रकल्प आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पेस एजन्सी फेब्रुवारीच्या मध्यात प्रक्षेपण करण्याचे लक्ष्य ठेवत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR