29.2 C
Latur
Saturday, February 8, 2025
Homeसोलापूरमहापालिकेची सोमवारपासून अंतर्गत रस्ते स्वच्छता मोहीम

महापालिकेची सोमवारपासून अंतर्गत रस्ते स्वच्छता मोहीम

झोननिहाय आठ पथके, ५६० कर्मचा-यांची नियुक्ती

सोलापूर : महापालिकेच्या वतीने महिनाभरापासून शहरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता मोहिम सुरू आहे. आता शहरातील अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता मोहिम हाती घेतली जाणार आहे. सोमवार १० ते २२ फेब्रुवारी दरम्यान स्वच्छता मोहीमेचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे. सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत मोहिम घेतली जाणार आहे. यासाठी झोननिहाय आठ पथके तैनात केली आहेत. एका पथकामध्ये ७० असे ५६० सफाई कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे.

अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी पदभार घेतल्यापासून शहर स्वच्छ करणा-यांबरोबर प्लस्टिक मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी सफाई कर्मचारी आणि अधिका-यांसोबत घेत शहरात स्वच्छता मोहिम राबवली. यामध्ये शहरातील मुख्य रस्ते स्वच्छ करण्याबरोबर फुटपाथ पाण्याने धुवून घेतले. रस्ते दुजाभाजक आणि रस्त्यांच्या कडेला असलेली काटेरी झुडपे काढली. त्यामुळे शहरातील रस्ते चकाचक झाले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मावा खाऊन रस्ते घाण करणा-या नागरिकांच्या आणि विक्रेत्यांच्या विरोधात वळवला.

रस्ते घाण करणा-यांच्या विरोधात मोहिम घेत दंडात्मक कारवाई केली. सकाळ अथवा दुपारच्या सत्रात बाजारपेठा स्वच्छ करता येत नसल्याने बाजार पेठातील रस्ते स्वच्छता मोहिम घेतली. आता शहरातील अंतर्गत रस्ते स्वच्छता मोहिमेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. १० फेब्रुवारीपासून या मोहिमेचा शुभारंभ केला जाणार आहे.

झोननिहाय आठ पथकांची नियुक्ती केली आहे. एक पथकामध्ये ७० कर्मचारी असे ५६० सफाई कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. तरीदेखिल रस्त्यावर कचरा दिसल्यास आता आरोग्य निरीक्षकास जबाबदार धरत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शहरात मोठ्या प्रमाणत कचरा साठला आहे. गाड्या अभावी हा कचरा रस्त्यांवर तसाच पडून राहतो. शहरात अशी २९४ ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो. हा कचरा उचलण्यासाठी फक्त १२ घंटागाड्या आहे. त्यामुळे शहरात साठलेला कचरा उचलला जात नाही, आता ९० घंटागाड्या देण्यात आल्या आहेत.
कचरा संकलनाचा मक्ता वॉटर गेज कंपनीला दिला आहे. या मक्तेदारांने चार सब मक्तेदारांची नियुक्ती केली आहे. या मक्तेदारांकडून कचरा संकलनाचे नियोजन केले जात नाही त्यामुळे शहरात ठिकिकाणी लाखो टन कचरा पडलेला आहे. त्यामुळे सोलापूर शहर हे कचरापूर झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR