22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयइंटरनेट बंद, १५ जिल्ह्यांत कलम १४४ लागू, २ स्टेडियमचे तुरुंगात रूपांतर

इंटरनेट बंद, १५ जिल्ह्यांत कलम १४४ लागू, २ स्टेडियमचे तुरुंगात रूपांतर

नोएडा : शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतक-यांना रोखण्यासाठी काटेरी तारा आणि काँक्रीट बॅरिकेड्स लावून सीमा सील करण्यात आली आहे. हरियाणातील ७ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमधून शेतकरी दिल्लीला रवाना झाले आहेत. शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आणि ट्रॉलीने दिल्लीला जात आहेत. या शेतक-यांना हरियाणातच रोखण्याची तयारी सुरू करण्यात आली.

दिल्लीच्या सर्व सीमांवर कलम १४४ लागू करण्यात आले आहे. शेतक-यांना रोखण्यासाठी काँक्रीटचे बॅरिकेड्स, रस्त्यावर धारदार कठडे, काटेरी तारे बसवून या सीमांचे वाड्यांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. याशिवाय चंदीगडमध्ये दोन महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

हरियाणात अंबाला, सिरसा, रोहतक, सोनीपत, झज्जर, ंिजद, कुरुक्षेत्र, कैथल, हिसार, फतेहाबाद, भिवानी आणि पंचकुला याठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. शेतकरी नेत्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.

शेतक-यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील दोन स्टेडियमचे तात्पुरत्या तुरुंगात रूपांतर करण्यात आले आहे. अंबालाजवळील शंभू सीमेवर पंजाबची सीमा सील करण्यात आली आहे. जिंद आणि फतेहाबादमध्ये पोलीस आणि प्रशासन हाय अलर्टवर आहे.

तर सिरसा येथील चौधरी दलबीर सिंग इनडोअर स्टेडियम आणि डबवली येथील गुरु गोविंद सिंग स्टेडियमचे तात्पुरत्या तुरुंगात रूपांतर करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणाला अटक झाल्यास त्याला या कारागृहात हलवले जाईल.

शेतक-यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणात सोशल मीडियावर बारीक नजर ठेवली जात आहे. फतेहाबाद, सिरसा, अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार आणि डबवली येथे इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR