19.3 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeछत्रपती संभाजीनगर‘लाडक्या बहिणी’त भावांची घुसखोरी

‘लाडक्या बहिणी’त भावांची घुसखोरी

फोटो, आधार कार्ड महिलांचे अर्जावर नाव पुरुषांचे, भावांचा भांडाफोड

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. राज्य सरकारने आतापर्यंत एक कोटी ५९ लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३००० रुपये दिले आहेत. या योजनेचा काही जण गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रकरणं उघडकीस येत आहेत.

नवी मुंबईतील महिलांच्या आधार क्रमांकाचा वापर करुन एका व्यक्तीने पत्नीच्या नावे ३० अर्ज दाखल केल्याचे प्रकरण ताजे असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. कन्नड तालुक्यातील १२ भावांनी महिलांचे फोटो लावून स्वत: अर्ज भरल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणी कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळावा, यासाठी संभाजी नागरच्या कन्नड तालुक्यातील १२ भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वत:चा अर्ज भरल्याची बाब महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. कन्नड तालुक्यात १२ अर्ज असे आले होते, स्क्रुटिनीच्या वेळी ते अर्ज पुरुषांचे असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे ते रिजेक्ट करण्यात आले आहेत. यात आधार कार्ड महिलांचे आणि नाव पुरुषाचे होते अशी माहिती महिला व बाल्य कल्याण विभागाच्या अधिकारी रेश्मा चिमंद्रे दिली.

दाखल करण्यात आलेल्या अर्जाच्या स्वीकृतीसाठी तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या अर्जाची या विभागाच्या कर्मचा-यांनी ३० ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता हा प्रकार समोर आले. तालुक्यातील १२ जणांनी स्वत:च्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज अपलोड केले. आधार कार्डही स्वत:च्याच नावाचा अपलोड केला, तसेच हमीपत्रही स्वत:च्याच नावाने भरून दिला. पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले. आता या प्रकरणात कारवाई होणार आहे.

गैरफायदा घेणा-यांवर कारवाई करा : पवार
अजित पवार यांनी काल एका ठिकाणी भाषण करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा इशारा दिला होता. नवी मुंबईतील प्रकरणाचा दाखला देत ते म्हणाले होते की आम्ही देतो पण फसवणूक केली तर मग आम्ही तुरुंगात ही टाकतो. मग चक्की पिंिसग करा, असा इशारा अजित पवारांनी दिला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR