27 C
Latur
Saturday, November 30, 2024
Homeसोलापूरसोलापूरसह परिसरात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक जोमात

सोलापूरसह परिसरात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक जोमात

सोलापूर : औद्योगिकदृष्ट्या सोलापूर शहराची परिस्थिती ठीक नसताना दुसरीकडे रिअल इस्टेटमध्ये मात्र मोठी गुंतवणूक होत आहे. कारण सोलापुरात महाराष्ट्रातील अन्य शहरांच्या तुलनेत स्वस्तात जागा उपलब्ध आहे. भविष्यात जागांचे दर हमखास वाढणार असल्याने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढत चालली आहे.

सोलापुरात आता सोने, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आदींबरोबरच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढत आहे. कारण अल्पकाळातच गुंतवणुकीपासून मोठा फायदा होत आहे. जागांचे दर हे दोन-तीन वर्षांतच किमान दुप्पट, तिप्पट होत आहेत. परिणामी पैसा असलेली मंडळी हे रिअल इस्टेटमध्ये शहरालगत व शेजाराच्या ग्रामीण हद्दीत मोठ्या प्रमाणात हजारो एकर जागा आहेत. अशा जागा या अन्य शहरांच्या तुलनेत स्वस्त आहेत. अशा जागा खरेदी करून त्याचे प्लॉटस् पाडून विक्री करणे वा गृहप्रकल्प बांधण्याचे प्रमाण सोलापुरात वाढले आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक एकर जागा खरेदी करून त्याचे प्लॉटस् पाडून विक्री केली जात आहे. अनेकठिकाणी गृहप्रकल्पही राबविले जात आहेत. काहीठिकाणी जागांच्या किमती लाखांत नव्हे कोटीवर पोहोचल्या आहेत.

केवळ सोलापुरातील बांधकाम व्यावसायिक नव्हे; तर पुणे-मुंबई आदी शहरांतील व्यावसायिक सोलापुरात कोट्यवधींची गुंतवणूक करीत आहेत. अक्कलकोट रोड, विजापूर रोड, डोणगाव रोड अक्कलकोट रोड व विजापूर रोडवरील शहर हद्दीतील व लगतच्या ग्रामीण भागात खुल्या जागांना प्रचंड मागणी आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रिअल इस्टेटमध्ये अक्कलकोट रोडरवरील कुंभारीजवळ प्रति एकर जागेचे दर किमान ४० लाख ते अडीच कोटींपर्यंत आहेत. विजापूर रोड परिसरात ५५ लाख ते सव्वा कोटी, असे दर आहेत. अर्थात, महामार्गालगतच्या जागांचे रेट हे जास्त आहेत.

सोलापुरातील जागांचे दर हे अन्य शहरांच्या तुलनेत स्वस्त असल्याने केवळ श्रीमंतच नव्हे, तर मध्यमवर्गीयदेखील यामध्ये गुंतवणूक करणे धन्य मानत आहेत. कारण काही वर्षांतच अनेकपटींनी रिअल इस्टेटचे दर वाढत आहेत, जी गुंतवणूकदारांना कमी कालावधीत जास्त फायदा करून देत आहे. रिअल ईस्टेटमध्ये एजंटांची वाढती संख्या, हे त्याचेच द्योतक आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR