23.9 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeसोलापूरअक्षता सोहळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण

अक्षता सोहळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण

सोलापूर : जानेवारी महिन्यात असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर गड्डा यात्रे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर यावेत. तसेच या दौऱ्यात कुंभारी येथील रे नगर घरकुलाचे वाटप कार्यक्रम करण्याचे निमंत्रण सोलापूरचे खा.डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना दिल्याची खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली.

संसदीय अधिवेशन काळात मंगळवारी पंतप्रधान कार्यालयात खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याबाबत भेट घेतली. याप्रसंगी राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड या तीनही राज्यात भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रेशमी शाल देऊन सत्कार केला.

पंतप्रधानांचा कुंभारी येथील महत्त्वाकांक्षी प्रकल्प रे नगर घरकुल च्या वाटपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा अजून निश्चित झाला नाही. या अनुषंगाने खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी 14 जानेवारी रोजी सोलापूर दौरा निश्चित करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधान नरेन्द्र मोदी सन २०१९ दरम्यान ९ जानेवारीस आले होते, परंतु आता १४ जानेवारी रोजी येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. हा दौरा म्हणजे सोलापूरच्या विकासासाठी सुवर्णसंधी असून या दिवशी त्यांनी शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या सिद्धरामेश्वर अक्षता सोहळ्यास उपस्थित राहण्याची आग्रही विनंती केली. याप्रसंगी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांचे चरित्र ग्रंथ, संपूर्ण मंदिराचा फोटो, बाराबंदी देऊन सत्कार केला. त्यास पंतप्रधानांनी अत्यंत आस्थेने व उत्सुकतेने सत्काराचे स्वागत केले.

याप्रसंगी सिद्धरामेश्वरांच्या जीवनकार्याची माहिती, त्यांनी केलेल्या तलावाची निर्मिती, सामाजिक समरसतेचे प्रतीक असलेले सात नंदिध्वज, अक्षता सोहळ्याचे छायाचित्र, वैशिष्ट्ये याबाबतची संपूर्ण माहिती दिली. विशेषतः सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वैभवात भर टाकणाऱ्या पी.एम मेगा टेक्सटाइल पार्क होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. सोलापुरात त्यासाठी पोषक वातावरण असल्याने टेक्सटाइल पार्कची निर्मिती व्हावी. तसेच एशियाटिक टेक्सटाइल पार्कची मागणी पूर्ण व्हावी. तसेच सोलापुरातील तरुणांना स्थानिक रोजगार उपलब्ध होण्यासाठी सोलापुरात नवीन उद्योग स्थापन करण्याचीही विनंती केली आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR