25.1 C
Latur
Saturday, May 24, 2025
Homeराष्ट्रीयआयपीएल : अ‍ॅपद्वारे ऑनलाईन सट्टेबाजी; केंद्र सरकारला नोटीस

आयपीएल : अ‍ॅपद्वारे ऑनलाईन सट्टेबाजी; केंद्र सरकारला नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) अंतिम टप्प्याकडे आली आहे. त्याचवेळी आयपीएलच्या नावावर ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून होणा-या सट्टेबाजीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. या ऑनलाईन सट्टेबाजीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.

ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून इंडियन प्रीमियर लीगच्या नावावर देशभरात सट्टेबाजी आणि जुगार सर्रासपणे सुरु आहे. त्याची गंभीर नोंद सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. ऑनलाइन सट्टेबाजी व जुगार खेळण्यासाठी वापरल्या जाणा-या ऍपवर निर्बंध आणण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. त्यावर केंद्र सरकारकडून उत्तर मागवले आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठात या याचिकेवर सुनावणी झाली. याचिका दाखल करणारे के. ए. पॉल यांनी म्हटले की, ऍपसाठी २५ पेक्षा जास्त बॉलीवूड आणि टॉलीवूड अभिनेते प्रचार करत आहे. काही प्रसिद्ध खेळाडूसुद्धा त्याचा प्रचार करत आहे. ऑनलाइन सट्टेबाजीमुळे अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातने हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मान्य करत म्हटले, ही एक सामाजिक विकृती आहे. ज्या पद्धतीने आपण हत्यांच्या घटना थांबवू शकत नाही, त्याचपद्धतीने सट्टेबाजी कायद्याने थांबवणे अवघड आहे. जेव्हा लोक स्वेच्छेनेच सट्टेबाजीत सहभागी होतात, तेव्हा कायद्याने त्यावर नियंत्रण आणणे अवघड आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR