कोलकाता : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानातील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सलामीच्या लढतीत मैदानात आपल्या बॅटिंगचा धमाका दाखवण्यापूर्वी विराट कोहलीनं स्टेजवर डान्स करत जलवा दाखवल्याचे पाहायला मिळाले. सलामीच्या लढतीआधी उद्घाटन सोहळ्यात शाहरुख खान सूत्रसंचालन करताना पाहायला मिळाले.
या कार्यक्रमात पहिल्या हंगामापासून १८ वर्षे एकाच फ्रँचायझी संघाकडून १८ नंबर जर्सी घालून मैदानात उतरणा-या किंग कोहलीचा बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानही करण्यात आला.
क्रिकेट सामना सुरु असताना अनेकदा विराट कोहली डान्स स्टेपसह चाहत्यांचे मनोरंजन करताना पाहायला मिळाले आहे. यावेळी आयपीएल उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात त्याने ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. ‘झुमे जो पठान’ या गाण्यावर शाहरुख खान आणि विराट कोहली दोघांनी स्टेजवर डान्स केला. त्याआधी शाहरुख खान याने आपल्या ताफ्यातील सुपरस्टार रिंकू सिंहलाही स्टेजवर नाचवले. लुट पूट गया या गाण्यावर रिंकूनं आपल्या डान्सची कला सादर केली.