28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयइराणचा पुन्हा पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राईक’

इराणचा पुन्हा पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राईक’

 जैश अल-अदलच्या प्रमुखाला केले ठार

तेहरान – तानी हद्दीत जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेचा कमांडर इस्माईल शाह बक्श आणि त्याच्या काही साथीदारांना ठार केल्याचा दावा इराणच्या लष्करी दलाने केला आहे.

इराण इंटरनॅशनल इंग्लिश या वृत्तवाहिनीने शनिवारी सकाळी देशाच्या सरकारी माध्यमांच्या हवाल्याने ही बातमी प्रसारित केली. एक महिन्यापूर्वीही इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश अल-अदलच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही इराणच्या हद्दीत हवाई हल्ला केला होता.

अल अरबिया न्यूज रिपोर्टनुसार, जैश अल-अदल दहशतवादी संघटना २०१२ मध्ये उदयास आली. या संघटनेचे प्रमुख केंद्र इराणच्या दक्षिणेकडील सिस्तान बलुचिस्तान येथे आहे. मागील काही वर्षांपासून जैश अल-अदलने इराणच्या सुरक्षा दलावर अनेकदा मोठे हल्ले केले. गेल्या डिसेंबरमध्येही जैश अल-अदलने सिस्तान बलुचिस्तानमध्ये एका पोलिस स्टेशनवर हल्ला करत त्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्यात जवळपास ११ पोलिस अधिकारी-कर्मचारी यांची जीव गेला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR